नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याला सुरू असलेल्या विरोधाने देशात अनेक ठिकाणी हिंसक वळण घेतले आहे. आंदोलनाच्या नावाखाली हिंसक झालेल्या जमावाचा एक व्हिडीओ गुजरातमधील अहमदामधून समोर आला आहे. आंदोलनानंतर काही पोलीस कर्मचारी परत जात असताना काही आंदोलनकर्त्यांनी त्यांना घेरत त्यांच्यावर दगडफेक केल्याची घटना गुरूवारी घडली. या व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी स्वत:ला वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
Ashish Bhatia, Police Commissioner, Ahmedabad on violence in Shah Alam area of the city: We have detained around 32 people, we are registering FIR. We are identifying others based on CCTV footage. 19 police personnel were injured in the incident. #CitizenshipAmendmentAct https://t.co/aioqj7vNbB pic.twitter.com/gQHVVh49Rs
— ANI (@ANI) December 19, 2019
अहमदाबादमधील शाह आलम परिसरात ही घटना घडली. यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या हिंसक आंदोलनानंतर अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनीही प्रतिक्रिया दिली. या प्रकरणी 32 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हिंसक आंदोलन करणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे. या घटनेत 19 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी गुरूवारी गुजरात बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. पालनपुरमध्येही हजारो जण रस्त्यावर उतरल्याने रस्ता बंद झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. यानंतर परिस्थिती चिघळली आणि काही आंदोलकांनी पोलिसांच्या गाडी उलटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अहमदाबाद पालनपुर महामार्ग बंद करण्यात आला होता.