नागपूर – खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण क्रिकेटपटू हार्दिक पांड्या होता. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हार्दिक पांड्यासोबत क्रिकेटही खेळले.
गडकरी आणि फडणवीस यांनी गोलंदाजी तर हार्दिकने फलंदाजी केली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी टाकलेला एकही चेंडू हार्दिक पांड्याला खेळता आला नाही.
Maharashtra: Union Minister Nitin Gadkari & former Maharashtra CM Devendra Fadnavis played cricket with Hardik Pandya in Nagpur during the ‘Khasdar Krida Mahotsav’ programme, yesterday. pic.twitter.com/L7hdZTghw1
— ANI (@ANI) January 25, 2020
दरम्यान, हादिक पांड्या दुखापतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट खेळताना दिसत नाही. हार्दिकने २२ सप्टेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आपला शेवटचा क्रिकेट सामना खेळला होता. तसेच पांड्याने नववर्षात म्हणजेच १ जानेवारी रोजी मॉडेल नताशाशी साखरपूडा केला.