व्हिडीओ – बिहारमध्ये सीएए, एनआरसी’चे विरोधक-समर्थक भिडले

पाटणा – सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरून सध्या देशभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. देशातील विविध भागांमध्ये CAA, NRC विरोधात व समर्थनार्थ अशी परस्परविरोधी आंदोलने सुरु असून काही ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळण मिळाल्याचेही पाहायला मिळत आहे.

अशातच आज बिहार येथील सीतामढी शहरामध्ये CAA, NRC ला विरोध व समर्थन करणाऱ्या दोन गटांमधील आंदोलनकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध वृत्तसंस्था एएनआयने दिलं असून एएनआयने याबाबतचा एक चित्रफीत देखील ट्विट केली आहे. एएनआयने उपलब्ध करून दिलेल्या या चित्रफितीमध्ये दोन गटांमधील आंदोलनकर्ते लाकडी दांडक्यांचा वापर करून एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.