Malaika Arora | Nora Fatehi : अभिनेत्री नोरा फतेहीने अमेरिकन मेनस्ट्रीम म्युझिक व्हिडिओंमध्ये पदार्पण केले आहे. ती अमेरिकन गायक जेसन डेरुलो सोबत ‘स्नेक’ या गाण्यात झळकली आहे. सध्या हे गाणे तुफान व्हायरल होत असून, सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. नोरा फतेहीचा डान्स धुमाकूळ घालत आहे. आता अभिनेत्री मलायका अरोरानेही या गाण्यावर जबरदस्त डान्स करून तापमान वाढवले आहे. खरंतर, अलीकडेच नोरा आणि जेसन गाण्याचे प्रमोशन करताना दिसले.
हे दोन्ही कलाकार एका रिअॅलिटी शोमध्ये पोहचले होते. यावेळी त्यांनी हा डान्स सादर करून दाखवला. स्वतः नोराने या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नोरा, जेसन आणि मलायका एकत्र नाचताना दिसत आहेत. नोरा आणि मलायका यांनी त्यांच्या किलर आणि मादक अदांनी खळबळ उडवून दिली. व्हिडिओ शेअर करताना नोराने लिहिले, ‘INSANE VIBES, आमचे नवीन गाणे पाहत राहा’.
View this post on Instagram
मलायका आणि नोराचा जबरदस्त लूक
या व्हिडिओमध्ये मलायका अरोरा काळ्या रंगाच्या लेदर साडीत दिसली. तर, दुसरीकडे नोरा फतेही हिरव्या रंगाच्या साडीत दिसली. नोराने तिचा लूक मॅचिंग ब्लाउज आणि साइड पार्टेड हेअरस्टाईलने पूर्ण केला. या लूकमध्ये दोन्ही अभिनेत्री अतिशय ग्लॅमर्स आणि सुंदर दिसत आहेत.
‘या’ शोमध्ये मलायका अरोरा दिसली होती
मलायका अरोराबद्दल बोलायचे झाले तर, ती तिच्या नृत्याने चाहत्यांना प्रभावित करते. ती रिअॅलिटी शोजचे जज देखील करते. तिने इंडियाज बेस्ट डान्सर, इंडियाज गॉट टॅलेंट, झलक दिखला जा, नच बलिये सारख्या शोचे परीक्षण केले आहे.