‘जर्सी’ चित्रपटातील शाहिद कपूरचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर लवकरच पुन्हा एकदा तेलुगू चित्रपटाच्या रिमेक मध्ये झळकणार आहे. कबीर सिंगच्या अभूतपूर्व यशानंतर शाहिदला साऊथ रिमेकच्या चित्रपटांसाठी चांगलीच मागणी मिळताना दिसून येते.

दरम्यान, बॉलिवूडमध्ये लवकरच “जर्सी” या तेलुगू चित्रपटाचा रिमेक तयार होणार असून, या चित्रपटात सुद्धा शाहिद कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. जर्सी हा चित्रपट एक स्पोर्टस ड्रामा असणार आहे. नुकतंच या चित्रपटातील शाहिद कपूरचा क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाहिदच्या या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळताना दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

#jersey #prep

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

तसेच, गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटातील शाहिदच्या लूक देखील प्रदर्शित करण्यात आला होता. जर्सी चित्रपट पुढच्या वर्षी २८ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.