हैद्राबाद: तेलंगणाची राजधानी हैद्राबादमध्ये काच्चीगुडा स्थानकात दोन रेल्वेंची समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात झाला होता. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघाताचा अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. या अपघातात सुमाऱे १६ प्रवाशी जखमी झाल्याचे वृत्त आहे.