बावडा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असलेल्या पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्यांच्या काठावर वसलेल्या श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे होत असलेल्या नीरा व भीमा नद्यांना पूर आला आहे. यामुळे गावातील नागरिकांना संगमावर वसलेल्या मंदिरात आसरा देण्यात आला आहे. परंतु, याच मंदिराला पाण्याने वेढा घातल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
गावातील अनेक दुकाने पाण्याखाली गेली आहेत. तेथे सुमारे 10 ते 12 फूट पाणी आहे. तसेच गावातील अनेक रस्तेही पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. गाव जलमय दिसत आहे. गावातील अनेक कार्यालये पाण्याखाली गेली आहेत. शिवाय अनेक घरे पाण्यात आहेत.