ससाणेनगर रेल्वे क्रॉसिंगजवळील पर्यायी भुयारी मार्ग सुरू

आता खुशाल भुयारी मार्ग करावा - योगेश टिळेकर

हडपसर : गेली चाळीस वर्षे ससाणेनगर -सय्यद नगर येथील रेल्वेगेट क्रमांक सातवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होता. मात्र मी आमदार झाल्यानंतर येथील वाहतुकीला पर्यायी मार्ग म्हणून रेल्वेगेट क्रमांक सहा आणि सातच्या तसेच सात आणि आठच्या मध्ये दोन भुयारी मार्ग केले. पालिका आणि रेल्वे विभागाचा तीन वर्षे पाठपुरावा करून आज त्यातील एक भुयारी मार्ग सुरू होत आहे.आणि एक-दीड महिन्यात दुसराही भुयारी मार्ग सुरू होईल. हे दोन्ही पर्यायी भुयारी मार्ग सुरू झाल्यावर येथील वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आता ज्यांना-ज्यांना ससाणेनगर रेल्वेगेट क्रमांक सातवर भुयारी मार्ग करावा वाटतो तो त्यांनी निश्चितच करावा ,कारण आता मी माझ्या नागरिकांना चांगले पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिल्याचे आज मोठे समाधान मला वाटते आहे,अशी भावना भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केली.

गुलाब पुष्प आणि मास्कचे वाहनचालकांना वाटप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज वाहनचकलकांना गुलाबपुष्प आणि मास्क देऊन सासणेनगर रेल्वेगेट क्रमांक सात जवळील न्यु ईंग्लिश स्कुल समोरील पर्यायी भुयारी मार्ग माजी आमदार योगेश टिळेकर यांनी वाहतुकीस खुला करून दिला.त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी भाजप हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, माजी अध्यक्ष सुभाष जंगले, नगरसेविका स्थायी समिती सदस्य उज्वला जंगले, नितीन होले,पोपटराव वाडकर, गणेश घुले, संजय सातव, भुषण तुपे, नाना ससाणे, महेश ससाणे, गणेश वाडकर, संतोष दवणे, संजय भुजबळ, आकाश डांगमाळी, इम्तियाज मोमीन आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी आमदार योगेश टिळेकर म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांपासून वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या ससाणेनगर, सय्यदनगर,हांडेवाडी आणि महमंदवाडी वासीयांना काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण सात क्रमांक रेल्वे फाटकाजवळील पर्यायी भुयारी मार्ग आज दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे.

दरम्यान, एक-दीड महिन्यात रवी पार्क जवळील दुसरा भुयारी मार्गाचे काम पूर्ण होणार असून, त्यावेळी हा भुयारी मार्ग सर्व वाहनांसाठी खुला होईल,त्यानंतर येथील मुख्य रेल्वेगेट क्रमांक सातवरील वाहतूक कोंडी सुटण्यास काही प्रमाणात मदत होईल. हे दोन्ही पर्यायी भुयारी मार्ग आहेत. मुख्य रेल्वेगेटवर भुयारी मार्ग सुरु केल्यानंतर त्याचे काम पुढील तीन वर्षे चालणार होते. तेव्हा त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध नव्हता शिवाय त्या भुयारी मार्गाला अनेक अडचणी आणल्या जात होत्या. येथील रेल्वे फाटकावर नेहमी प्रचंड ट्राफिकचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. ही वाहतूक कोंडी एवढी प्रचंड असते की, त्यामुळे वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी भूयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले. परंतु पावसाळ्यात चार महिने काम पुढे गेले, मात्र आता एक भुयारी मार्ग सुरू करताना मोठे समाधान होत आहे. असे यावेळी टिळेकर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.