#व्हिडीओ : नारायण गावातील टोमॅटो मार्केटला पावसाचा फटका

ओतूर : सध्या पावसाचा जोर सर्वच ठिकाणी वाढला आहे. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसताना दिसत आहे. जुन्नर तालुक्‍यातील नारायण गावच्या बाजारपेठेत टोमॅटोचे पावसामुळे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात टोमॅटोची आक पावसामुळे चांगलीच घटली आहे. यामुळे बाजारभावातदेखील कमतरता आली आहे. माल व्यवस्थित नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर दुसरीकडे उत्पादन आणि वाहतुक खर्च वजा करता टोमॅटोला पुरेसा दर मिळत नसल्याने शेतकरी वर्गातही नाराजी पसरली आहे. दरम्यान, प्रतवारीप्रमाणे तिनशे ते चारशे रुपयांपर्यंत भाव मिळण्याची शक्‍यता सध्यातरी व्यक्‍त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.