मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर ‘हिरकणी’ आणि ‘ट्रिपल सीट’ हे दोन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आणि याच आठवड्यात ‘हाऊसफुल 4’ , ‘सांड की आँख’ आणि ‘मेड इन चाइना’ हे तीन मोठे हिंदी चित्रपट सुद्धा रिलीज झाले आहे.
मराठी चित्रपटांचा चांगला आशय असूनही स्क्रीन्स मिळत नसल्याने महाराष्ट्रातील मराठी कलाकार व राजकीय नेते संतप्त झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेता रमेश परदेशीने देखील पुण्यातील प्रभात टॉकीज (किबे. लक्ष्मी) परिसरात जोरदार आंदोलनात केले होते.
दरम्यान, आता अभिनेता सुबोध भावे यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सुबोधने मराठी चित्रपटांना योग्य वेळेचे शो मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. महाराष्ट्रातच मराठी माणसाला आणि मराठी चित्रपटाला आपल्या हक्कासाठी लढावं लागत असल्याचं सुभोध भावे यांनी म्हंटल आहे.