VIDEO : लस घेतल्यानंतर नाशिकमधील वृद्धाला ‘चुंबकीय” शक्ती? पहा व्हायरल व्हिडीओ…

नाशिक – कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे कोरोनावरील लस.. पण हीच लस घेऊन तुमच्या शरीरात समजा चुंबकत्व निर्माण झाले आणि शरीराला सर्व वस्तू अचानक चिटकायला सुरूवात झाली तर यामुळे तुमचाही गोंधळ उडेल. असाच प्रकार नाशिक येथील जेष्ठ नागरिका बरोबर घडला आहे. नाशिकातील  सिडको  शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार यांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञदेखील गोंधळात पडले आहेत.

सोशलवर व्हायरल व्हिडियोमध्ये अरविंद सोनार यांच्या शरीरावर कुठल्याही धातूच्या वस्तू थेट चिटकत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याचा व्हीडीओ व्हायरल होत आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी, कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतले होते.  मात्र  काही दिवसांनंतर  त्यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्या. या व्हिडियोमध्ये त्यांनी शरीराला वस्तू  चिकटवून दाखवल्या.

सध्या सोशलवर त्यांचा व्हिडियो तुफान व्हायरल झाला असून महापालिकेचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  आश्चर्य व्यक्त केले आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.