बचत खात्यासाठी व्हिडिओ केवायसी

मुंबई -स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) बॅंकेने योनो या मोबाइल बॅंकिंग ऍपवर व्हिडिओ केवायसीच्या मदतीने खाते उघडण्याची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना आता बॅंकेच्या शाखेला भेट न देता नवे एसबीआय बचत खाते सुरू करता येणार आहे. या डिजिटल उपक्रमाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली असून ही संपूर्णपणे संपर्कविरहीत आणि कागदपत्रांशिवाय होणारी प्रक्रिया आहे.

ही व्हिडिओ केवायसी सुविधा एसबीआयमधे नवे बचत खाते सुरू करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले, ग्राहकाची सुरक्षा, आर्थिक सुरक्षा आणि किफायतशीरपणा यांची खात्री करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. या उपक्रमामुळे मोबाइल बॅंकिंगला नवा आयाम प्राप्त होईल तसेच बॅंकिंगविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी डिजिटल मार्ग अवंलबण्याची सक्षमता ग्राहकांमधे येईल.

2017 मधे लॉंच झालेल्या योनोने 80 दशलक्ष डाउनलोड्‌स आणि 37 दशलक्ष नोंदणीकृत युजर्ससह ग्राहकांमधे स्वीकृती मिळवली आहे. एसबीआयने योनो प्लॅटफॉर्मवर 20 पेक्षा जास्त विभागांमधे 100 ई- कॉमर्स कंपन्यांबरोबर भागिदारी केली आहे. यात योनो कृषी, योनो कॅश, पीएपीएल यांचा समावेश आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.