कोल्हापूर – कोल्हापूरच्या महापुरात व्हिनस कॉर्नर येथे रेस्क्यू करताना बोट पलटल्याची घटना घडली. तीन महिलांना अडकलेल्या ठिकाणाहून बाहेर काढताना अचानक ही बोट पलटी झाली. त्यांना वेळीच बचाव पथकाने मदत करत सुरक्षितस्थळी हलवले.
कोल्हापूरात पुराच्या पाण्यामुळे अनेकजण घरांमध्ये अडकले आहेत. त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी 700 ते 800 जणांची टीम कार्यरत आहे. बचावकार्यासाठी एनडीआरफचे पथक सुद्धा तैनात करण्यात आले आहे. हेच बचावकार्य सुरू असताना ही घटना घडली. काल पासून दिवस रात्र हे बचाव कार्य सुरू आहे. 20 हजारांहून अधिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. या दरम्यानच ही एक घटना घडली. तिन्ही महिला आता सुखरूप असून सुरक्षितस्थळी त्यांना हलविण्यात आले आहे.