# व्हिडीओ : कोल्हापुरात दोन ट्रक गुटखा जप्त; उजळाईवाडी महामार्ग पोलिसांची कारवाई

सुमारे 1 कोटींचा गुटखा: दोन ट्रक जप्त: दोघे ताब्यात

कोल्हापूर – पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर शहराजवळ २ ट्रक गुटखा जप्त करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या उजळाईवाडी महामार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. गुटख्याची किंमत सुमारे 1 कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. महामार्ग पोलिसांची ही आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे.

राज्यामध्ये गुटखा आणि पानमसाला विक्री करण्यास बंदी आहे. मात्र मागील काही वर्षापासून कोल्हापूर शहर आणि जिल्हयामध्ये तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा खाण्याचे व्यसन वाढले आहे. या अनुषंगाने कोल्हापूर महामार्ग पोलिसांनी उजळाईवाडी येथे वाहन तपासणी नाका उभारण्यात आला होता. यावेळी वाहन तपासणी दरम्यान वाहतूक पोलिसांना दोन ट्रकचा संशय आल्याने त्यांनी तपासणी केली असता हिरा पान मसाल्याची पोती आढळली. यावेळी अहमदनगरचा सलमान अमित खान आणि औरंगाबादचा परवेज अजीज उल्लाखान या दोन्ही ट्रक ड्रायव्हरला वाहतूक पोलिसानी ताब्यात घेतलं आहे. या गुटख्याची किंमत सुमारे १ कोटी रुपये असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई उजळाईवाडी महामार्ग मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शंकर कोळी, पोलीस हवालदार संदीप पाटील, तात्यासाहेब मुंडे, रवींद्र नुल्ले, प्रकाश कदम, शहाजी पाटील, योगेश कारंडे, अभिजित चव्हाण, तोसिफ मुल्ला, आशिष कोळेकर, रामदास मेटकर यांनी केली आहे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)