काबूल : अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर अत्याचाराच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. मात्र, तालिबानी सतत असा दावा करत आहे, की ते इथल्या लोकांचं आयुष्य चांगलं बनवणार आहेत. त्यातच आता तालिबानमधील माध्यमांची स्थिती समोर आली असून पत्रकारांना बंदुतीच्या दहशतीत मुलाखती घ्याव्या लागत आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ समोर आला आहे.
अफगाणिस्तानमधील एका न्यूज चॅनलच्या कार्यालयात तालिबानची एन्ट्री झाली होती. त्यानंतरचा हा व्हिडीओ आहे. या न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये एका बाजूला अँकर तर दुसऱ्या बाजूला तालिबानचा कमांडर कारी समीउल्लाह होता. अँकरच्या मागे काही बंदूकधारी आहेत.
धक्कादायक म्हणजे अँकरला बंदुकीचा धाक दाखवून मुलाखत देण्यात येत होती. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अँकरच्या मागे असलेले दहशतवादी स्पष्ट दिसून येतात. स्टुडिओत एकूण 7 दहशतवादी बंदुका घेऊन अलर्ट मोडवर उभे होते.
The #Taliban‘s style of giving interviews to media; Guns at the head of the anchor.
This tragedy never happened in the history of media.
#Afghanistan #Kabul pic.twitter.com/zO095guIrG— Hizbullah Khan (@HizbkKhan) August 29, 2021
1990 च्या राजवटीत तालिबान मुलींच्या शिक्षणाच्या पूर्णपणे विरोधात होते. परंतु यावेळी अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवल्यापासून तालिबान सतत आपल्यातील बदलाबद्दल बोलत आहे. मात्र पत्रकारितेची गळचेपी सुरू असल्याने तालिबान आपला मुळ स्वभाव खरचं सोडणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय.