नवी दिल्ली: भारताला पहिले राफेल लढाऊ विमान मिळाले आहे. विजयादशमी आणि एअरफोर्स डेनिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह फ्रान्सच्या बोर्डेक्स येथील डॅसॉल्ट प्लांटमध्ये पोहोचले व तेथून विमानं ताब्यात घेतले. राफेल हे आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त एक लढाऊ विमान आहे. राफेल यांच्या हस्तांतरण सोहळ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, हा एक ऐतिहासिक दिवस आहे.