पुणे – मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. मराठी माणसाच्या हक्काचा विषय असो वा एखाद्याला मदत करणं असो मोरे आपली प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून देत असतात. अश्यातच आता पुन्हा वसंत मोरे यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
वसंत मोरे यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील भरभरून कमेंट केल्याचं दिसून येत आहे. नुकतंच वसंत मोरे यांनी पुण्यातील कात्रज चौकात एका एका अपघातामुळे पलटी झालेले वाहन नागरिकांच्या मदतीने उचलून बाजूला केले आहे. हाच प्रसंग स्वतः वसंत मोरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्वांशी शेअर केला आहे.
आपल्या ट्विटमध्ये वसंत मोरे म्हणतात की, “अंगात रग असली ना की कुठेही आणि कसेही भिडता येते… त्याचे झाले असे, कात्रज चौकात प्रचंड ट्रॅफिक जाम झाले होते कारण पुलावर एका भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि कार पुलावरील पोलला धडकून भर रस्त्यात पलटी झाली होती आणि त्याच क्षणाला मी नेमका पुलाखालून जात होतो.
अंगात रग असली ना की कुठेही आणि कसेही भिडता येते.
त्याचे झाले असे, कात्रज चौकात प्रचंड ट्रॅफिक जाम झाले होते कारण पुलावर एका भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि कार पुलावरील पोलला धडकून भर रस्त्यात पलटी झाली होती आणि त्याच क्षणाला मी नेमका पुलाखालून जात होतो,(१/३) pic.twitter.com/BoNAX50ryQ
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) June 9, 2023
तेव्हाच मला माझा कोंढवा रोडचा कार्यकर्ता शेहबाज शेख याचा फोन आला आणि त्याने वरील प्रसंग सांगितला. मी लगेच जागेवर पोचलो तर गाडी रस्त्यात आडवी, एकही गाडी जाऊ शकत नव्हती. क्षणाचाही विलंब ना करता एरवी मोबाईल वर सक्रिय असणाऱ्या आमच्या उभ्या तरुणांना जे तिकडे फक्त बघ्याच्या भूमिकेत उभे होते,
त्या सर्वांना मी एक आवाहन केले आणि क्षणाचाही विचार न करता अनेक हात माझ्या मदतीसाठी पुढे आले आणि चक्क ती गाडी आम्ही उचलून दुभाजकावर ठेवली आणि मग ट्रॅफिक सुरळीत करून घेतली. या आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. सध्या वसंत मोरेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.