#video# कमलेश तिवारी हत्या प्रकरणात गुजरात एटीएसची मोठी कारवाई

गुजरात एटीएसकडून तिघांना अटक

नवी दिल्ली : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येचा कट गुजरातमध्ये रचल्याची माहिती समोर आली आहे. तसेच उत्तर प्रदेश पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला अटक केली आहे. या प्रकरणी गुजरात एटीएसनेही मोठी कारवाई केली आहे. गुजरात एटीएसने तिघांना अटक केली आहे. शुक्रवारी हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची हत्या लखनऊमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लखनऊ नाका भागात कमलेश तिवारी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर तिवारी यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंरतु मात्र ट्रॉमा सेंटरमध्येच त्यांचा मृत्यू झाला.


मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कमलेश तिवारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ज्यानंतर त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली होती. ज्यानंतर लखनऊमधली दुकानेही बंद करण्यात आली होती. त्यांच्या हत्येनंतर लखनऊमध्ये तणावाचे वातावरण पसरले होते. तसेच सर्व दुकानेही बंद करण्यात आली होती. आता गुजरात एटीएसने मोठी कारवाई केली आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी गुजरात एटीएसने तिघांना अटक केली आहे.


कमलेश तिवारी यांच्यावर गोळी चालवणारे हल्लेखोर बाईकवरुन आले होते. याप्रकरणी पोलिसांवरही निष्काळजीपणाचा आरोप केला जातो आहे. कारण कमलेश तिवारी यांचा नोकर अर्धा तास हा नंबर डायल करत होता, मात्र फोन लागला नाही. घटना घडल्यावर अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळाने पोलीस पोहचले असेही तिवारी यांच्या नोकरानं सांगितलं. कमलेश तिवारी यांच्या कार्यालयाजवळ तीन जण बाईकवर आले होते. कमलेश तिवारी यांना भेटवस्तू देण्याच्या निमित्ताने ते त्यांच्या कार्यालयात शिरले. तिथे त्यांनी कमलेश तिवारींवर गोळी झाडली आणि पळ काढला होता.

त्यांच्या हत्येनंतर साध्वी प्रज्ञा यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली होती. कमलेशजी तिवारी यांची क्रुर हत्या देश, धर्म, हिंदुत्वासाठी मोठा आघात आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, भारतमातेच्या सुपूत्रास शत शत प्रणाम असे त्या म्हणाल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.