न्यूयॉर्क – अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे आता वेगळ्याच प्रकरणावरून चर्चेत आले आहेत. जो बायडेन यांनी पत्रकाराला शिवी दिल्याचा प्रकार घडला आहे. पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर चिडलेल्या बायडेन यांनी त्याला शिवी दिली. बायडेन शिवी देताना माईक सुरू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही, त्यामुळे ते रेकॉर्ड झालं आणि सध्या बायडेन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
My favorite moment of 2022 so far. @POTUS very appropriately reacting to Peter Doocy of Fox News.
pic.twitter.com/7g0dCdgvMy— Fred Guttenberg (@fred_guttenberg) January 24, 2022
सोमवारी पत्रकार परिषदेनंतर पत्रकार खोलीतून बाहेर पडत होते. यावेळी ‘फॉक्स न्यूज’च्या पत्रकाराने बायडेन यांना महागाई ही राजकीय जबाबदारी आहे का?, असा असा प्रश्न विचारला. त्यावर अध्यक्ष बायडेन यांनी पत्रकाराला शिवी दिली. पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर थोडावेळ ते काहीच बोलले नाही. नंतर “ही एक खूप मोठी संपत्ती आहे. जास्त महागाई,” असं म्हणाले. त्यानंतर पत्रकाराकडे पाहून काय वेडा माणूस आहे, असं म्हणत त्यांनी son of a b**ch अशी शिवी दिली.