मुंबई – बोरीवलीतून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये 15 ते 20 जणाच्या टोळक्याने एका वकीलावर काठ्या आणि तलवारीने सपासप वार केले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपांचा शोध घेण्यात येत आहे. सत्यदेव जोशी, असं पीडित वकीलाचं नाव आहे. सदर घटना 8 जुलै रोजीची आहे.
दरम्यान वकील सत्यदेव जोशी यांच्यावर हल्ला का करण्यात आला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरच एचएमबी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Video : बोरिवलीत टोळक्याचा वकिलावर हल्ला; सपासप तलवारीने केले वार
सविस्तर बातमी…. https://t.co/QpcIDVgrMP pic.twitter.com/3O8ChHUBIa— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) July 19, 2021
व्हायरल व्हिडीओच्या अधारे पोलिसांनी तिघांना अटक केली असून आरोपींविरुद्ध भादंवि कलम 307, 326, 324, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर उर्वरित आरोपांचा शोध घेण्यात येत आहे.