#video : सल्लुची एन्ट्री होताच चित्रपटगृहात फोडले फटाके; भाई जानने केलं ‘अंतिम’ आवाहन, म्हणाला….

मुंबई – अभिनेता सलमान खानचा ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ हा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर सलमानच्या चाहत्यांनी सिनेमागृहातच फटाके फोडत आपला आनंद साजरा केला.

सिनेमात सलमानचा फाईट सिन असताना त्याच्या फॅन्सने एका चित्रपटगृहात फटाके फोडले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

स्वतः सलमान खानने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करत या गंभीर प्रकरणाची दखल घेतली आहे. चित्रपटगृहात अश्या प्रकारे फटाके फोडल्यामुळे किती जीवघेणे परिणाम होऊ शकतात असं त्याने सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

व्हायरल व्हिडिओत फॅन्स फटाके फोडताना आणि शिट्ट्या मारताना दिसतात. “माझ्या सर्व चाहत्यांना विनंती आहे की चित्रपटगृहात फटाके नेऊ नये कारण ते एक मोठा आगीचा धोका आहे. ज्यामुळे तुमचा आणि इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो.”

तसेच, थिएटर मालकांना माझी विनंती आहे की…  सिनेमागृहात फटाके नेऊ देऊ नका आणि एंट्री पॉईंटवर सुरक्षा रक्षकांनीच त्यांना तसे करण्यापासून रोखले पाहिजे. चित्रपटाचा सर्व प्रकारे आनंद घ्या.. धन्यवाद.!!’ या आशयाची विनंती पोस्ट सलमान खान याने केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.