मुंबई- अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला आता चार महिने लोटली आहेत. मात्र त्याचे चाहते आणि बहीण श्वेता सिंग किर्ती त्याला न्याय मिळावा म्हणून सतत सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकतंच दिवाळी निमित्त सुशांतची बहीण श्वेता हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांचे पुन्हा एकदा आभार मानले आहेत.
View this post on Instagram
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये श्वेता कीर्ती म्हणते कि, “ही दिवाळी सुशांत सारखी… असाच होता. मी त्या सर्वांचे आभार मानते ज्यांनी भावाला त्यांच्या आशीर्वादात आणि दृदयात ठेवून दिवाळी साजरी केली आहे. #Diwali4SSR #YehDiwaliSushantWali असे हॅशटॅग सुद्धा तिने पोस्ट मध्ये वापरले आहेत. तुम्ही लोक आमचा परिवार आहात. प्रत्येत पावलावर आणि वळणावर आम्ही तुमचे प्रेम आणि समर्थन आजमवले आहे, धन्यवाद! असं म्हणत तिने आपल्या भावाला श्रद्धांजली वाहिली आहे.
View this post on Instagram