#video । मराठमोळ्या वैभवच्या शायराना अंदाजावर चाहते फिदा

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता वैभव तत्त्ववादी नेहमीचं आपल्या खास अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. तो एक उत्तम अभिनेता आणि डान्सर तर आहेच.

पण तो एक उत्तम शायरसुद्धा असल्याचे आता समोर आले आहे. वैभवने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. यामध्ये तो एक सुंदर शायरी म्हणताना दिसत आहे.

मराठीतील चॉकलेट बॉय वैभवने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये तो एक सुंदर शायरी म्हणत असल्याचं दिसत आहे.

“हुस्न को बे-हिजाब होना था, शौक को कामयाब होना था, कुछ तुम्हारी निगाह काफिर थी, कुछ मुझे भी खराब होना था’ शायर मजाज लखनवी यांची ही शायरी आहे.

वैभवच्या या अंदाजावर चाहते फिदा झाले आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक कमेंट्‌स येत आहेत. तितकेच लाईकसुद्धा मिळत आहेत.

कमेंट करत कोण वैभवच्या शायरी म्हणण्याच्या अंदाजाचं कौतुक करत आहे, तर कोणी त्याच्या डोळ्यातील दिसणाऱ्या त्या भावांचं. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास वैभव हा मराठीतील एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखला जातो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.