#Video: फडणवीस व आदित्य ठाकरे हेच महाराष्ट्राचे खरे ‘नायक’- अनिल कपूर

औरंगाबाद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हेच खरे महाराष्ट्राचे ‘नायक’ असल्याचं वक्तव्य बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांनी केलं आहे. एका कार्यक्रमासाठी अनिल कपूर औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी कपूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी राजकारणाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.

‘सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला कोण ‘नायक’ वाटतो? असा प्रश्न अनिल कपूर यांना विचारण्यात आला. त्यांनी देखील लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची नावं घेतली. आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मला खऱ्या आयुष्यातील ‘नायक’ दिसतो. दोघेही तरुण, तडफदार आहेत आणि अभ्यासू देखील आहेत.

तसेच, बाळासाहेब असल्यापासून माझे ठाकरे कुटुंबीयांशी चांगले संबंध आहेत, देवेंद्र फडवीसदेखील माझ्या चांगले परिचयाचे आहेत. त्यामुळे हे दोघंही महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील असा मला विश्वास आहे. असं अनिल कपूर यांनी म्हंटल आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.