#video: बायोपिक स्टार ‘सुबोध भावेंची’ आणखी एका ऐतिहासिक भूमिकेसाठीची तयारी

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणार महाराष्ट्राचा सुपरस्टार म्हणजेच अभिनेता ‘सुबोध भावे’ आपल्या मराठमोळ्या खासशैली तसेच मार्मिक चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याचे फॅन्स सुद्धा आपल्या लाडक्या कलाकाराच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात.

दरम्यान, मराठी बायोपिक आणि अभिनेता ‘सुबोध भावे’ यांचे एक समीकरण जुळले आहे. ‘लोकमान्य’, ‘बालगंधर्व’ आणि ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’,’प्रल्हाद केशव अत्रे’ अशा अनेक बायोपिक गाजल्या आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ हा पहिलाच चित्रपट हिट करून आपलं नाणं सुबोधने खणखणीत वाजवलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

नुकतंच सुबोध भावे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये सुबोध घोड सावरीची तालीम घेत असल्याचे दिसून येत आहे. सध्या सुबोध भावे यांच्या या व्हिडिओ वर फॅन्स तुफान लाईक्स अँड कमेंट करत आहे. तूर्तास तरी हा सुबोध यांनी या चित्रपटाबद्दल कोणताही खुलासा केला नाही. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.