नवी दिल्ली – मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अब्जाधिश गेट्स भारतीय रोटी बनवताना दिसत आहेत. बिल गेट्स यांनी सेलिब्रिटी शेफ ईथन बर्नाथसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते इथनंसोबत चक्क कुकिंग करताना दिसताहेत.
व्हिडिओमध्ये बिल गेट्स स्वतः कणिक मळण्यापासून ते रोटी भाजण्यापर्यंतचे सर्व काम स्वतः करताना दिसून येतात. यावेळी त्यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. ते प्रत्येक गोष्ट मोठ्या आनंदाने करताना व्हिडिओमध्ये दिसून येतात. एव्हढच नाही तर गेट्स रोटी बनवून झाल्यानंतर स्वतः बनवलेली रोटी तूप लावून स्वतःच खाऊन टाकताना व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत.
शेफने बिल गेट्सचा रोटी बनवतानाचा व्हिडिओ त्याच्या सोशल मिडीयावर शेअर केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांचे कौतुक केले. इंस्टाग्रामवर गेट्सच्या व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर करत पीएम मोदींनी लिहिले की, “उत्तम, तुम्ही खूप चांगली रोटी बनवली आहे.” यासोबत पंतप्रधान मोदींनी त्यांना बाजरीचे पदार्थ देखील ट्राय करा ज्यामुळे सर्व जण निरोगी राहतील असा सल्ला देखील दिला आहे.
.@BillGates and I had a blast making Indian Roti together. I just got back from Bihar, India where I met wheat farmers whose yields have been increased thanks to new early sowing technologies and women from “Didi Ki Rasoi” canteens who shared their expertise in making Roti. pic.twitter.com/CAb86CgjR3
— Eitan Bernath (@EitanBernath) February 2, 2023
बिल गेट्स यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अनेकांना गेट्स यांनी शेअर केलेल्या या आगळ्या वेगळ्या व्हिडिओच कौतुक वाटत आहेत. देश विदेशातील अनेकजण या व्हिडिओवर आपली मते मांडताना दिसत आहेत.