उत्तर प्रदेश – लोकसभा निवडणूक 2019 च्या महासंग्रमातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. राज्यातील 14 मतदारसंघांसह देशातल्या एकूण 117 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या दिग्गाजांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. अशातच, मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश येथील मुरादाबाद येथे भाजप कार्यकर्त्यांकडून निवडणूक अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार मुरादाबादमध्ये बूथ क्रमांक 231 वर निवडणूक अधिकारी मतदारांना समाजवादी पक्षाचे ‘सायकल’ या चिन्हावर बटन दाबण्यास सांगत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून निवडणूक अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली आहे.
#WATCH Moradabad: BJP workers beat an Election Official at booth number 231 alleging he was asking voters to press the ‘cycle’ symbol of Samajwadi party pic.twitter.com/FokdXCAJ1z
— ANI UP (@ANINewsUP) April 23, 2019