भोजपूर : मोबाईलच्या बॅटरीचा स्फोटामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे मोबाईल वापरताना, चार्जिंग करताना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येतात. आता दुरुस्ती करताना देखील काळजी घेण्याची गरज असल्याचं एका घटनेमुळे स्पष्ट झालं आहे.
बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातल्या नवादामध्ये असलेल्या एका मोबाईलच्या दुकानात असाच एक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीच्या मोबाईलची बॅटरी खराब झाल्यानं दुकानदारानं फोन उघडून बॅटरी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तितक्यात बॅटरीला आग लागली आणि स्फोट झाला.
मोबाईलच्या दुकानात झालेला स्फोट सीसीटीव्हीत कैद झाला आहे. स्फोट होताच तिथे उपस्थित असलेले लोक घाबरले. दुकानदारानं योग्य वेळी मोबाईल खाली टाकल्यानं त्याला इजा झाली नाही. न
रेडमी वाय २ मोबाईलची बॅटरी बदलण्यासाठी एक ग्राहक दुकानात आला होता. दुकानदारानं बॅटरी बदलण्यासाठी मोबाईल उघडताच बॅटरीचा स्फोट झाला आणि आग लागली.