#व्हिडीओ : रुग्णवाहिका अन्‌ गणेशभक्तांची जागरूकता

पुणे : स्थळ लक्ष्मी रस्ता… वेळ दुपारी चारची… गणेशभक्तांची तोबा गर्दी… रुग्णवाहिकेचा सायरन… क्षणार्धात वाट देण्यासाठी सरसावलेले कार्यकर्ते… रुग्णवाहिका रवाना… रुग्णावरील विघ्न दूर… एखाद्या हिंदी चित्रपटात शोभावा असा हा प्रसंग ऐन विसर्जन मिरवणुकीत पहायला मिळाला.

मानाच्या गणपतींची मिरवणूक पाहणसाठी पुणेकर लक्षावधीच्या संख्येने ल्मी रस्त्यावर एकत्र येतात. दोल ताशा पथकांच्या ताशा आणि ढोलच्या आवाजाचा दणदणाट टीपेला पोहोचलेला असतो. त्याचवेळी दुपारी चारच्या सुमारास लक्ष्मी रस्त्यावर गरूड गणपती जवळच्या रस्त्यावरून एक रुग्णवाहिका लक्ष्मी रस्त्यावर येते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने जागरूक पुणेकर बाजूला होतात. त्यात गोंधळ होऊ नये म्हणून कार्यकर्ते सरसावतात.

काही लाख जणांची गर्दी कापत काही सेकंदात ही रुग्णवाहिका रस्ता पार करत मार्गस्थ होते. सामाजिक जाणीव प्रगल्भ असणाऱ्या एका पुणेकरांमुळे एका रुग्णाचे प्राण वाचू शकतील, अशी भावना बंदोबस्तावरील एका पोलिस कर्मचाऱ्याने व्यक्त केली. ती पुणेकरांच्या जागरूकतेला मिळालेली पावतीच होती.

Leave A Reply

Your email address will not be published.