मुंबई – मलायका-अरबाज हे कपल कधी काळी बॉलिवूडमधील एक लोकप्रिय कपल म्हणून ओळखलं जायचं. 1998 मध्ये दोघांनी प्रेम विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी दोघांनी घरच्यांची सहमती घेऊन लग्न देखील केलं. मात्र पुढे 2017 मध्ये दोघांनी एक मताने विभक्त होण्याचा निर्णय घेत कायदेशीररीत्या काडीमोड घेतला. दोघेही आपापल्या आयुष्यामध्ये मूव्ह ऑन झाले असून मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला तर अरबाज जॉर्जिया इन्ड्रीयानीला डेट करतोय.
तेव्हा जेव्हा पण मलायका आणि अर्जुन कपूर एकत्र दिसतात तेव्हा त्यांचे फोटो व्हायरल होतात. नुकतंच, या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. काल अरबाज-मलायका त्यांच्या मुलाला सोडायला एअरपोर्टला आले होते, त्यादरम्यान दोघांनी एकमेकांशी संवाद साधला. त्यावेळी तिथं बोलत असलेल्या व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
मात्र, या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहून नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. तसेच अनेकांनी आपल्या संमिश्र प्रतिक्रिया देखील देण्यास सुरुवात केली आहे. “विभक्त होण्याचा निर्णय का घेतला असावा असा प्रश्न अनेकांना पडला असावा?’ असा सवाल सध्या नेटकरी विचारू लागले आहेत.
दरम्यान, सध्या मलायका बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेड करत आहे. मलायका-अर्जुन हे माध्यमांसमोर देखील एकमेकांसोबत मोकळेपणाने वावरताना अनेकदा पाहायला मिळालं आहे. सोशल मीडियावर देखील या जोडीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात.