#व्हिडिओ: लोकल ट्रेन मध्ये अमिताभ यांची संगीत मैफिल

मुंबई – बॉलिवूडचे महानायक ‘अमिताभ बच्चन’ सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. फेसबुक किंवा ट्विटर अकाउंटवरून ते सतत काहीतरी पोस्ट शेअर करत असतात. अमिताभ यांनी आपल्या शोषलं मीडिया अकाउंटवर नुकताच त्यांच्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये बिग बी मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेन मध्ये प्रवास करताना दिसत आहे. यावेळी त्यांनी व्हीटी ते भांडुप असा प्रवास केला होता.

दरम्यान, या प्रवासात बिग बी सौरभ निंबाळकर बरोबर गिटारचा आनंद घेतअसल्याचे दिसून येत आहे. यावेळी अमिताभ यांनी आपल्या चित्रपटातील ‘रंग बरसे’ हे गाणं म्हंटल. आणि रेल्वेवरील प्रवाशांना आश्चर्यचकित केले. मुंबईची लोकल ट्रेन, सौरभ आणि त्याची गिटार हे एक समीकरणच झाले आहे. सौरभ ट्रेन मध्ये गिटार वाजवून कॅन्सर पिडीत रुग्णांची मदत करत असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.