Video : “अल्लाहने पुन्हा माणसांचं तोंड दाखवू नये”, म्हणत तिने घेतली नदीत उडी

अहमदाबाद – कौटुंबिक समस्या आणि ताण-तणावामुळे मागील काही वर्षांत आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियावर आपल्या मनातील खंत व्यक्त करून अनेकजण आत्महत्येचा मार्ग निवडत आहेत. तर काहीजण लॉईव्ह आत्महत्यंच धाडस करतात. अशीच काहीशी घटना अहमदाबाद येथे घडली आहे. येथे एका २३ वर्षीय युवतीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून आपलं जीवन संपवल आहे. आयेशा खान असं मृत युवतीचं नाव आहे.

मयत आयेशाचा मृतदेह सापडला असून सासरच्या त्रासाला कंटाळून तिने जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी तिच्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयेशाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे लग्न २०१८ मध्ये राजस्थानमधील आरिफ खानसोबत झालं होतं. मात्र काही दिवसातच सासरच्या मंडळीकडून हुंड्यासाठी तगादा लावण्यात आला होता. त्यामुळे काही रक्कम दिली होती. मात्र सासरची मागणी वाढतच होती. काही दिवसांपूर्वीच आरिफने भांडण करून आयेशाला माहेरी पाठवलं होतं, असही आयेशाच्या वडिलांनी सांगितले.


आयेशाने मृत्यूपूर्वी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत आयेशा शेवटपर्यंत हसऱ्या चेहऱ्याने आपलं दु:ख सांगत होती. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या हसऱ्या चेहऱ्यामुळं नेटकरीही भावूक झाले. व्हिडिओत ती म्हणाली की, आल्लाहने आता मला पुन्हा माणसांच तोंड दाखवू नये. तसेच आपल्यावर कोणीही दबाव टाकला नसून कोणाला जबाबदार धरू नये.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.