पुणे : खडकवासला धरणापाठोपाठ आता पानशेत धरणही 99 टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संतततधार सुरूच असल्याने पानशेत धरणातून 2 हजार क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. तर खडकवासला धरणातून 16 हजार 200 क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुळा-मुठा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. बंडगार्डन बंधाऱ्याचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.