मुंबई – देशासह संपूर्ण राज्यात करोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात आता कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून, करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस सातत्याने लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मास्क घालण्याबाबत जागरूक करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी लोकांना मास्क घालण्यासाठी आणि करोना विषाणूबाबत जनजागृती करण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला होता. आणि पोलिसांच्या याच अनोख्या पद्धतीवर बॉलिवूड अभिनेत्री करीन कपूर खान ही चांगलीच खुश झाली आहे.
View this post on Instagram
इतकेच नव्हेतर चक्क करीनाने पुणे पोलिसांचा मास्कच्या जनजागृतीचा एक खास व्हिडीओ शेअर करत पोलिसांचे काैतुक केले आहे. अभिनेत्री करीना कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला असून, यामध्ये एक पोलीस “ए भाई जरा देख के चलो..’ हे गाणं म्हणताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर करीनाची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
दरम्यान, करिनाने शेअर केला हा व्हिडिओ पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद कळमकर यांचा असून, हे अनोखं गाणं स्वतः प्रमोद कळमकर यांनी तयार केलं आहे.