Video : “सारंग’चे हवाई प्रदर्शन

संबधित बातमी :  पुणे: वाचनातून बुद्धिवान लढवय्ये होण्याचा प्रयत्न करा

पदवी प्रदान समारंभापूर्वी एनडीएचे मुख्यालय असलेल्या सुदान ब्लॉक समोरील प्रांगणात हवाई दलाच्या सारंग हेलिकॉप्टर चमूने चित्तथरारक कसरती सादर करत उपस्थितांना खिळवून ठेवले. हवेतल्या हवेत गिरकी घेणे, अगदी धडक होईल इथपर्यंत एकमेकांजवळ येऊन दूर जाणे अशा अनेक कसरती या चार हेलिकॉप्टर्सच्या टीमने सादर केली. यामध्ये वाईनग्लास, डायमंड, क्रॉस ओव्हर, हार्ट, स्पिल्ट अशा कसरतींचा समावेश होता. हिंदुस्थान एअरोनॉटिक्‍स लिमिटेडने विकसित केलेल्या “ध्रुव’ या देशी बनावटीच्या “ऍडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर’च्या माध्यमातून या कसरती सादर झाल्या. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सारंग या हेलिकॉप्टर तुकडीने सादर केलेल्या हवाई प्रात्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकली.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)