नवी दिल्ली: जगभरातील विविध विषयांवरील व्हिडिओ एकाच ठिकाणी काही क्षणात मिळण्याचे ठिकाण म्हणजे युट्यूब. याच यू ट्यूबवरील व्हिडिओंचा खजिन्याला झाली आज १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रत्येक विषयावरील व्हिडिओ येथे उपलब्ध असल्याने अल्पावधीतच यू ट्यूब सुपरहिट ठरले. आजघडीला यू ट्यूबवर रोज काही लाखांवर व्हिडिओ अपलोड होत असतात. हा सिलसिला तब्बल १३ वर्षांपूर्वी, २३ एप्रिल २००५ रोजी, म्हणजे आजच्याच दिवशी सुरू झाला होता.
चॅड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम या त्रिकुटामुळे यू ट्यूबचा जन्म झाला. यू ट्यूबचे संस्थापक जावेद करीम यांनी आजच्या दिवशी पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. ‘Me at the Zoo’ (‘मी अॅट द झू’) असं या व्हिडिओचे नाव असून तो केवळ १८ सेकंदांचा होता. त्यात करीम एका प्राणीसंग्रहालयाच्या आत उभे आहेत आणि तिथे असलेल्या प्राण्यांबाबत सांगत आहेत. हा व्हिडिओ जावेदच्या मित्राने याकोव लापित्स्कीने रेकॉर्ड केला होता. यूट्यूबरील हा पहिला वहिला व्हिडिओ ४८ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा