सातारा – समसमान मते मिळालेल्या माण व कोरेगाव मतदारसंघात चिठ्ठीद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातील उमेदवार विजयी झाले. माणमधून शिवसेनेचे शेखर गोरे तर कोरेगावातून शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचे समर्थक सुनील खत्री विजयी झाले.
कोरेगाव आणि माण प्राथमिक कृषी पतपुरवठा गटातील उमेदवारांना समान मते मिळाली होती. त्यामुळे येथे चिठ्ठी टाकून विजय उमेदवाराची घोषणा केली आहे.
कोरेगावमध्ये सुनील खत्री आणि शिवाजीराव महाडिक यांना प्रत्येकी पंचेचाळीस मिळालेले आहेत. येथे 90 मतदान झाले होते. येथे खत्री विजयी झाले.
माणमध्ये शेखर गोरे आणि मनोज पोळ यांना प्रत्येकी 36 मते मिळाली आहेत. येथे एकूण 74 तर मते होती. मात्र मतदानादिवशी 72 मतदान झाले होते दोन मतदारांनी मतदान प्रक्रियेचे पाठ फिरवली होती. येथे गोरे विजयी झाले.