गावागावात जल्लोष : सुनील शेळकेंनी घेतले तुकोबांचे आशीर्वाद
मावळ – मावळात सुनील शेळके यांच्या रुपाने मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाला 25 वर्षांनंतर धूळ चारण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश आले. या निर्भेळ यशानंतर मावळ तालुक्यात खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिवाळी साजरी केली. गावागावात सुनील शेळके यांच्या विजयाचे तोरण लावत गुलालाची उधळण करीत फटाके फोडण्यात आले. विशेष म्हणजे विजयानंतर सुनील शेळके यांनी श्री क्षेत्र देहूगाव येथे तुकोबांचे आशीर्वाद घेतले.
मावळ विधानसभा मतदारसंघात राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव करीत मोठ्या मताधिक्याने विजयश्री मिळवलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील शेळके यांच्या समर्थकांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विजयाचा जल्लोष केला. त्यावेळी कामशेत शहरातील मुख्य रस्त्यावर शेळके यांच्या विजयाच्या घोषणा देत-भंडारा उधळण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
घवघवीत विजयानंतर शेळके यांनी सायंकाळी देहूतील मुख्य मंदिरात श्री विठ्ठल-रखुमाई आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांनी विश्वस्त संजय महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, माजी विश्वस्त अभिजीत महाराज मोरे आदीच्या उपस्थित शाल, श्रीफळ, प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.
सोमाटणे येथे समर्थकांकडून गुलालाची उधळण
सोमाटणे – राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा दारूण पराभव केला. सुनील शेळके यांच्या विजयाने सोमाटणे राष्ट्रवादीच्या वतीने विजयी मिरवणुका काढून जल्लोष केला. ढोल व ताशांच्या गजरात व वाड्याच्या आवाजात तसेच फटाक्यांची अतिषबाजी करीत चौराईनगर ते गावठाण अशी मिरवणूक विष्णू मुऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. या वेळी माजी सरपंच नवनाथ मुऱ्हे, विशाल मुऱ्हे, महेंद्र मुऱ्हे, नितीन मुऱ्हे, राकेश मुऱ्हे, सरपंच गोकुळ गायकवाड, प्रशांत मुऱ्हे, शरद मुऱ्हे, सचिन मुऱ्हे, रामभाऊ मुऱ्हे, उमेश जव्हेरी, हसन शेख तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
देहूगावात विजयी फेरी…
देहुरोड : राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सुनील शेळके विजयी झाल्यावर देहूत कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजी केली. एकमेकांना पेढे भरवत गुलाल आणि भंडाराची उधळण करीत तालुक्यात झालेल्या परिवर्तनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सरपंच पूनम काळोखे, महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिलाध्यक्षा वैशाली टिळेकर, ग्रामपंचायत सदस्य राणी मुसुडगे, कार्यकर्त्या छाया बुचडे, सुश्मिता गायकवाड, माजी सरपंच मधुकर कंद, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अभिमन्यू काळोखे, प्रकाश टिळेकर, कांतीलाल काळोखे, रमेश काळोखे, देहूगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे योगेश मोरे, शंकर काळोखे, विशाल काळोखे, प्रशांत काळोखे, संदीप शिंदे, प्रदीप काळोखे, विशाल परदेशी, मच्छिंद्र चव्हाण, अभिजित काळोखे, आदिनाथ काळोखे, सोमनाथ मुसूडगे, जयेश मोरे, महेश मोरे, माणिक जाधव यांच्यासह गावातील जगदंबा मित्र मंडळ, दिल दोस्ती मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते. माळीनगर येथे देखील हनुमान मित्र मंडळ, सावतामाळी मित्र मंडळ, यंगस्टार मित्र मंडळ, चॅलेंडर मित्र मंडळ, शिवतेज मित्र मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल व भंडाराची उधळण करीत विजयी फेरी काढली.
मावळ विधानसभेची निवडणुकीत महाआघाडीच्या नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवत उमेदवारी दिली. तो विश्वास सार्थ ठरवत मावळच्या जनतेने सार्थ ठरविला. मावळच्या जनतेचे आभार मानतो. मुख्यमंत्र्यांनी विनंती करूनही काही ठराविक मंडळींनी माझी उमेदवारी नाकारली. जनतेला विकास हवा आहे, पैसा आणि दहशतीला बाजूला ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली आहे. जे निष्ठावंत होते, ते माझ्या पाठीमागे उभे राहिले. खऱ्या निष्ठावंतांनीच भाजपला संपविले. माझा विजय मी नम्रपणे स्वीकारतो. तालुक्याचा विकास हेच माझे उद्दिष्ट आहे. मावळच्या जनतेने आता दिवाळी साजरी करावी. यापुढे प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी कटिबद्द राहिल, याची ग्वाही देतो.
– सुनील शेळके, विजयी उमेदवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस.