‘विक्की वेलिंगकर’च्या ट्रेलर आऊट

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आतापर्यंत अनेक रहस्यमय चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.या चित्रपटांबाबत प्रेक्षकांमध्ये नेहमीच उत्सुकता पहायला मिळते. मराठीमध्ये पहिल्यांदाच ‘मास्क मॅन’ लूक असलेला प्रयोग आगामी ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटाच्या निमित्ताने करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

काळाने रचलेल्या वेळेच्या भूलभुलैय्यातून विक्की वेलिंगकर बाहेर पडेल? #VickyVelingkar #6Dec #TrailerOutNow @vickyvelingkarfilm Presenter : @arjunsbaran & @kartiknishandar in association with @dancingshivaproduction @chokshipranay⁣⁣ Produced by : @gseamsak @anuyachauhankudecha @riteshkudecha @sachu_loki @tarkaratul⁣⁣ ⁣⁣⁣⁣ ⁣⁣Directed by : @saurabhthevarma ⁣⁣ ⁣⁣ Cast : @sonalee18588 @spruhavarad⁣⁣⁣⁣⁣ @sangramsamel @kettansingh⁣ @marathicineyug @marathimanoranjanvishwa ⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣@rajshrimarathi @ultramarathi @fillamwala @marathistars @marathipr @instantmarathiworld @beingmarathi @rava__official @cinegossips @megamarathi @marathiasmitaofficial @marathiiworld @helo_indiaofficial @vickyvelingkarfilm

A post shared by Vicky Velingkar Film (@vickyvelingkarfilm) on


या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका आहे. मात्र, ‘मास्क मॅन’च्या मागे कोणाचा चेहरा दडलेला आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या अत्यंत गुढ आणि रहस्यमय अशा टीझरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळला. यानंतर आता या बहुप्रतीक्षित सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्याला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री स्पृहा जोशीचा या चित्रपटातील लूक समोर आला होता. या टीझरमध्ये ती विक्कीला वाचवू शकेल?’ प्रश्न विचारला गेला आहे. तसेच टीझर रहस्यमय चित्रपट त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्कंठा आणखी वाढली आहे.

तत्पूर्वी, अभिनेत्री स्पृहा जोशीचा या चित्रपटातील लूक समोर आला होता. स्पृहा जोशी या चित्रपटामध्ये विद्या नावाचे पात्र साकारत आहे. या चित्रपटात स्पृहाची भूमिका नेमकी काय आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना ६ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल’ अस दिग्दर्शक सौरभ वर्मा यांचं सांगणं आहे. ‘विक्की वेलिंगकर’ हा मराठी चित्रपट ६ डिसेंबर २०१९ ला होणार प्रदर्शित होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)