मुंबई – बॉलीवूडमध्ये अभिनेता ‘विकी कौशल’ याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. चित्रपटसृष्टीत आता त्याला हमखास यश मिळविणा-या अभिनेत्यांपैकी मानले जात आहे. विकीचा ‘उरी ः द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपर हिट ठरला होता. आता तो परत एकदा आपल्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.
In rememberence of one of India’s finest- Field Marshal #SamManekshaw. This journey is going to be very special with @meghnagulzar @RonnieScrewvala @RSVPMovies #BhavaniIyer @iShantanuS @bharatrawail pic.twitter.com/iKI7NdEZgD
— Vicky Kaushal (@vickykaushal09) June 27, 2020
देशातील पहिले फिल्ड मार्शल सैम मानेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये काम करताना विकी दिसणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. यात तो हुबेहूब मानेकशॉ यांच्यासारखा दिसतो आहे. या बायोपिकचं नाव सैम असं आहे.
दरम्यान, नुकतंच या चित्रपटातील विकी कौशलचा आणखी एक लुक समोर आला आहे. यामध्ये तो स्क्रीनवर सैम मानेकशॉ यांची भूमिका निभावण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसून येत आहे. फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या पुण्यतिथिनिमित्त त्यांच्या बायोपिकच्या निर्मात्यांनी विक्की कौशलचा हा लुक सादर केला आहे.