बॉलीवूड अभिनेता विक्की कौशल आणि मानुषी छिल्लर आपल्या आगामी चित्रपटामुळे सध्या खूपच प्रसिद्धिच्या झोतात आहेत. आता या चित्रपटाचे नाव निश्चित करण्यात आले असून ‘द ग्रेट इंडियन फॅमिली” असे चित्रपटाचे नाव असणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाची निर्मिती ‘यशराज फिल्म्स’च्या बॅनरखाली तयार करण्यात येणार असून यात विक्की आणि मानुषीची जोडी झळकणार आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे बरेचसे शूटिंग विक्की आणि मानुषी यांनी पूर्ण केले आहे. त्यानंतर आता या चित्रपटाचे शिर्षक निश्चित करण्यात आले आहे. यशराज निर्मित “पृथ्वीराज’ हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटातून मानुषी छिल्लर बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. यामुळे ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ पुढील वर्षाच्या सुरुवातीला रिलीज करण्यात येणार आहे. हा एक कौटुंबिक विनोदी चित्रपट असून अभिनेता विक्की हा पहिल्यांदाच विनोदी चित्रपटात काम करत आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास विक्की कौशलकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. विक्की लवकरच ‘अश्वत्थामा’मध्ये झळकणार आहे. याशिवाय तो सरदार उधम सिंह यांच्यावर आधारित असलेल्या बायोपिकमध्ये काम करत आहे.