विकी कौशलचा “भूत’ रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर मस्त एन्ट्री घेतली आहे. विकीच्या आतापर्यंतच्या प्रवासावर नजर टाकली तर त्याने अगदी वैविध्यपूर्ण सिनेमे निवडले आहेत, असे दिसते. “उरी’मध्ये बिनधास्त, निडर कमांडोच्या रोलमधील विकी “भूत’मध्ये चक्क घाबरलेला दिसतो आहे. तसे बघितले तर विकी स्वतः काही हॉरर सिनेमाचा शौकिन नाही. त्याने आतापर्यंत जेवढे हॉरर सिनेमे बघितले आहेत, त्याच्या आधारे आपण कधी हॉरर सिनेमात काम करू असे त्यालाही वाटले नव्हते. पण या सिनेमाची धाटणीच वेगळी होती. त्यामुळे त्याने “भूत’ स्वीकारला.
“भूत’मध्ये भूताने झपाटलेल्या रिकाम्या जहाजावर एकट्याने वावरणे हेच खूप भीतीदायक होते. काही सीन खूप टेक्निकल होते. त्याची थोडी सवय करून घ्यावी लागली. भूताची त्याला भीती वाटत नाही. त्याला भीती वाटते, ती पाण्याची. समुद्राच्या मध्यभागी एखाद्या बोटीवर एकटा असण्याचे फिलींगच त्याच्यासाठी खूप भीतीदायक असे असते. एरवी एखादा हॉरर सिनेमा एकट्याने बघणे त्याच्यासाठीही खूप कठीण आहे. यापूर्वी “कॉन्ज्युरिंग’ आणि “एनाबेल’सारखे हॉरर त्याने बघितले आहेत. पण त्यापेक्षाही स्वतःचा “भूत’ बघण्यात त्याला जरा जास्त मजा आली.