Vicky Kaushal | Triptii Dimri : अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांचा ‘बॅड न्यूज’ चित्रपट येत्या 19 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अश्यातच या चित्रपटातील एक गाणे देखील रिलीज करण्यात आले आहे, जे करण औजलाने गायले आहे.
‘तौबा-तौबा’ असे या गाण्याचे नाव असून, या गाण्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. विक्की कौशल आणि करण औजला यांच्या जोडीने लोकांना नाचायला भाग पाडले.
दरम्यान, तृप्ती डिमरीने विक्की कौशलसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला. या गाण्याचा टिझर देखील नुकतंच रिलीज करण्यात आला असून, यामध्ये या जोडीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
तृप्ती डिमरी यांनी शेअर केलेला फोटो बॅड न्यूजच्या दुसऱ्या गाण्यातील आहे. हे शेअर करताना तृप्ती यांनी कॅप्शनमध्ये ही माहिती दिली आहे की, चित्रपटाचे दुसरे गाणे 9 जुलै रोजी रिलीज होणार आहे. हॅशटॅगसह गाण्याचे नाव ‘जानम’ असे लिहिले आहे. या फोटोमध्ये तृप्ती आणि विकी पाण्यात उभे असल्याचे दिसत आहे.
विक्की कौशल-तृप्ती डिमरी वर्कफ्रंट
विक्की आणि तृप्तीच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर, विकी सध्या ‘छावा’ चित्रपटात काम करत आहे, ज्यामध्ये तो छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
यासोबतच विकी संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. बॅड न्यूजनंतर तृप्ती दिमरी कार्तिक आर्यनसोबत ‘भूल भुलैया 3’ मध्ये दिसणार आहे.