Harbhajan singh biopic | गेल्या काही वर्षांपासून बायोपिक चित्रपटांचा ट्रेंड खूप वाढल्याचे पाहायला मिळत आहे. खेळाडुंवर आधारित बायोपिक नहेमीच अनेकांचे लक्ष वेधून घेतात. भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी याच्यावर आधारित ‘एम.एस. ‘धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या बायोपिक चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
यानंतर आता आणखी एका भारतीय क्रिकेटरवर चित्रपट येणार आहे. भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या जीवनावर आधारित बायोपिकबाबत चर्चा केली आहे. याशिवाय त्याने या भूमिकेसाठी कोणता अभिनेता योग्य ठरेल, याबाबतही सांगितले आहे. Harbhajan singh biopic |
एका मुलाखतीदरम्यान हरभजन म्हणाला की, “माझ्या जीवनातील एक-दोन कथा अशा आहेत ज्या मी जगासमोर आणू इच्छितो. लवकरच त्याबाबत घोषणा करेन. जेव्हा त्याला विचारण्यात आले की बायोपिकमध्ये मुख्य भूमिका कोण साकारू शकेल, तेव्हा हरभजनने विकी कौशलचे नाव घेतले. तसेच तो नंबर वन असल्याचेही त्याने सांगितले. Harbhajan singh biopic |
View this post on Instagram
विकी कौशल आपल्या सरदार उधम सिंग आणि सॅम माणेकशॉ यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओळखला जातो. हरभजनने बायोपिकसाठी चित्रपट निर्माते दीपक यांच्या सर्जनशील क्षमतेची प्रशंसा केली. यानंतर आता हरभजनच्या जीवनावर आधारित बायोपिकची अधिकृत घोषणा कधी होईल, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, विकी कौशलने ‘सॅम बहादूर’मध्ये भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय, त्याने आणखी एक बायोपिक चित्रपट केला आहे, तो म्हणजे ‘सरदार उधम’ ज्यामध्ये त्याने भारतीय क्रांतिकारक उधम सिंह यांची भूमिका साकारली होती.
त्याचा आगामी चित्रपट ‘छावा’ हा पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तो छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तो संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
हेही वाचा:
Chitra Wagh : देवाभाऊ का असली पिक्चर अभी बाकी है…. आता तो काय करतो ते बघाच – चित्रा वाघ