मालविका मोहनशी जोडल जातेय विकी कौशलच नाव

“हाऊज द जोश’ म्हणत देशातील प्रत्येकाच्या मनात आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता विकी कौशल “उरी- द सर्जिकल स्ट्राईक’नंतर बॉलिवूडमधील एक आवडता अभिनेता बनला आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर खूप कमी काळात विकीने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. त्यातच सध्या त्याच्या फीमेल फॅन फॉलोइंगमध्ये पण चांगलीच वाढ झालेली आहे. काही काळापूर्वी विकी अभिनेत्री हरलीन सेठी सोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र आता त्यांचे ब्रेकअप झाले आहे. हरलीनसोबत ब्रेक अप होताच विकीचे नाव आता मालविका मोहनशी जोडले जाते आहे.

मालविकाने बियॉन्ड द क्‍लाऊड्‌स या चित्रपटातून चित्रपट इन्डस्ट्रीत प्रवेश केला होता. विकीला अनेकदा मालविकाच्या घरी सुद्धा बघितले गेले आहे. विकी नेहमीच लंच किंवा डिनरसाठी तिच्या घरी येतांना दिसतो आहे. रिपोर्टनुसार मालविका आणि विकी एकमेकांना लहानपणापासूनच ओळखतात. दोघे चांगले मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी विकी आपल्या भावासोबत मालविकाच्या घरी गेला होता. तिथे डिनर करतानाचा एक फोटो विकीने पोस्ट केला होता. मात्र अफेअर आणि डेटिंगच्या बातम्यावर विकी किंवा मालविकाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here