Ajay Devgan-Akshay Kumar | अभिनेता अजय देवगण आणि अक्षय कुमार नुकतेच ‘सिंघम अगेन’ चित्रपटात पाहायला मिळाले होते. यानंतर आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे. अलीकडेच अजयने पुढील चित्रपटात दिग्दर्शक म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे जाहीर केले होते. तर अक्षय कुमार या सिनेमात प्रमुख भूमिकेत अभिनय करताना दिसणार आहे.
या व्यतिरिक्त या चित्रपटात आणखी कोणते स्टार कास्ट पाहायला मिळणार याबाबत अनेकांना उत्सुकता होती. यातच आता अजयच्या या चित्रपटात आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
अजय देवगण आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमात विकी कौशलची वर्णी लागल्याचे म्हंटले जात आहे. हा सिनेमा कॉमेडी असणार असून अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. विकी कौशलने आपल्या कामाने अजय देवगणचे मन जिंकले आहे. हे लक्षात घेऊन, अजयने विचार केला की अक्षय कुमार आणि विकी कौशलची जोडी चित्रपटात रंजक ठरू शकते.
View this post on Instagram
याशिवाय अनेक वर्षांनी अजय देवगण दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. आता या सिनेमात अक्षयसोबत विकी कौशल कॉमेडी करताना दिसणार आहे. त्यामुळे अजय-विकी-अक्षय हे त्रिकूट एकत्र आल्यावर काय धमाल घडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही.
पुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होऊ शकते. कारण सध्यातरी अक्षय कुमार इतर सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर 2026 मध्ये सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ‘सुहाग’ (1994), ‘खाकी’ (2004), ‘इन्सान’ (2005), ‘सिम्बा’ (2018), ‘सूर्यवंशी’ (2021) आणि ‘सिंघम अगेन’ (2024) नंतर अजय देवगण आणि अक्षय कुमारची जोडी आणखी एका चित्रपटात दिसणार आहे. ज्यात आता विकी कौशल देखील असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा:
‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्रीने ‘या’ कारणामुळे घेतला मालिका सोडण्याचा निर्णय