नौदल प्रमुखांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका फेटाळली – संरक्षण मंत्रालयाचा निर्णय

नवी दिल्ली -व्हाईस ऍडमिरल करमबीर सिंग यांची नवे नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका संरक्षण मंत्रालयाने फेटाळून लावली. आणखी एक व्हाईस ऍडमिरल बिमल वर्मा यांनी ती याचिका दाखल केली होती.

विद्यमान नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा 31 मे यादिवशी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी नवे नौदल प्रमुख म्हणून केंद्र सरकारने याआधीच सिंग यांना पसंती दिली. त्या नियुक्तीला सेवाज्येष्ठतेच्या मुद्‌द्‌यावरून वर्मा यांनी आक्षेप घेतला. ते सिंग यांच्यापेक्षा सेवेने वरिष्ठ आहेत.

वर्मा यांनी मागील महिन्यात सशस्त्र दल लवादाकडे धाव घेतली. त्यानंतर लवादाने 25 एप्रिलला संरक्षण मंत्रालयाला तीन आठवड्यांत वर्मा यांच्या याचिकेवर निर्णय घेण्याचा आदेश दिला. त्यावर संरक्षण मंत्रालयाने निर्णय घेत सेवाज्येष्ठता हा नियुक्तीचा एकमेव निकष नसल्याचे सांगत वर्मा यांची याचिका फेटाळली. आता वर्मा त्या निर्णयाला लवादाकडे दाद मागून आव्हान देणार आहेत. त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.