व्हाइस एडमिरल करमबीर सिंह नौदलाचे नवे प्रमुख

नवी दिल्ली – पूर्व नौदल कमांडचे सध्याचे कमांडर व्हाइस एडमिरल करमबीर सिंह यांची नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे नौदल प्रमुख सुनील लांबा हे येत्या ३१ मे रोजी निवृत्त होणार आहेत. १९८० मध्ये करमबीर सिंह यांनी नौदलात आपली सेवा बजावण्यास सुरुवात केली. वाइस एडमिरल करमबीर सिंगच्या यांच्या कमांडमध्ये सध्या मिसाइल विनाशक आयएनएस राणा आणि आयएनएस दिल्ली यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी वेस्टर्न फ्लीटचे फ्लीट ऑपरेशन्स ऑफिसर म्हणून आणि ध्वज अधिकारी कमांडिंग म्हणून महाराष्ट्र व गुजरात क्षेत्र येथे काम केले आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.