IPL 2025 | आयपीएलचा नवीन सीझन उद्यापासून (22 मार्च) सुरू होत आहे. आयपीएलचे सामने पाहण्यासाठी तुमच्याकडे जिओहॉटस्टारचे सबस्क्रिप्शन असणे आवश्यक आहे. तुम्ही स्मार्टफोनवर जिओहॉटस्टार अॅपच्या माध्यमातून आयपीएलचे सामने लाइव्ह पाहू शकता. मात्र, जिओहॉटस्टारचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी वेगळे पैसे खर्च करण्याची गरज नाही.
तुम्हाला व्होडाफोन आयडियाच्या (Vi) रिचार्ज प्लॅन्सच्या माध्यमातून JioHotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. Vi ने JioHotstar सबस्क्रिप्शनसह येणारे तीन नवीन प्लॅन्स लाँच केले आहेत. या रिचार्ज प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Vi चा 101 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
Vi चा 101 रुपये किंमतीसह येणारा हा केवळ डेटा प्लॅन आहे. या प्लॅनची मुदत 30 दिवस असून, यात एकूण 5 जीबी डेटा मिळतो. यासोबतच, तीन महिन्यांचे JioHotstar मोबाईल सबस्क्रिप्शन देखील मिळते. प्लॅनमध्ये कॉलिंग-एसएमएसचा फायदा मिळत नाही.
Vi चा 239 रुपयांचा प्लॅन
व्होडाफोन आयडियाच्या 239 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सला अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, एकूण 300 एसएमएस आणि 2 जीबी दररोज डेटा मिळेल. या प्लॅनची मुदत 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी JioHotstar मोबाईलचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
Vi चा 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
Vi च्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि 2 जीबी दररोज डेटा मिळतो. याशिवाय 28 दिवसांसाठी JioHotstar मोबाईल सबस्क्रिप्शनसह वीकेंड डेटा रोलओव्हर बेनिफिट देखील उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. या तिन्ही रिचार्ज प्लॅन्ससह तुम्ही जिओहॉटस्टारवर आयपीएलचे सामने पाहू शकता.