सोलापूर- सोलापूर जिल्हा दुधसंघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी आमदार दिलीप माने यांच्यासह अनेक दिग्गजांनी दंड थोपटले होते. पण मंगळवारी बळीराम साठे, दिलीप माने, सिध्देश्वर अवताडे, विकास गलांडे, प्रभाकर कोरे, कौशल्या नवले, अलका बंडगर, संताजी पाटील, शहाजी पाटील, रेवती साखरे, आदी 26 जणांचे अर्ज अपात्र ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
क्रियाशील संस्था प्रतिनिधीमध्ये 31 जणांचे अर्ज वैध ठरले आहे. महिला मतदारसंघात 28, अनुसुचीत जातीजमातीमध्ये 3 तर इतर मागासवर्गीय प्रतिनिधीमध्ये 10, भटक्या विमुक्तमध्ये 15 अर्ज मंजूर झाल्याची यादी निवडणूक निर्णय अधिकार्यांनी जाहीर केली आहे. एकूण 113 पैकी 26 अर्ज नामंजूर तर 87 जणांचे अर्ज मंजूर झाले आहेत.